MESCO Pune Recruitment : मेस्को पुणे अंतर्गत पिंपरी चिंचवड येथे वाहन चालक पदाची भरती सुरू कोणतीही परीक्षा नाही, थेट मुलाखती द्वारे होणार निवड

MESCO Pune Recruitment : मेस्को पुणे अंतर्गत पिंपरी चिंचवड परिसरामध्ये वाहन चालक पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.ही भरती पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालय आणि फायर पॉइंट येथे होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.(Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited) भरतीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास थेट मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील

 • वाहनचालक

पदसंख्या

 • एकूण – 60 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

 • पिंपरी चिंचवड, पुणे

पगार (MESCO Pune Recruitment)

 • मासिक पगार – दरमहा 31,314 असून यामध्ये (कपात 3700 रुपये) दर महिन्याला वाढीव महागाई भत्ता कामगार कायद्यानुसार ईपीएफ व इतर भत्ते देखील उमेदवारांना मिळणार आहेत.

अर्ज पद्धती

 • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • 1 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया

 • या भरतीसाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

 • मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- 411  001

मुलाखतीचा पत्ता

 • स्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – 411  001

मुलाखतीची तारीख

 • 1 सप्टेंबर 2023

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

 • जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना (माजी सैनिक ओळखपत्र,पेन्शन पेमेंट ऑर्डर, डिस्चार्ज बुक तसेच पाल्यांनी पाल्य असल्याचा पुरावा आणावा)
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड बँक
 • पासबुक व चार पासपोर्ट आकाराचे फोटो

वयोमर्यादा

 • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय माजी सैनिकांसाठी 55 वर्ष व पाल्यांसाठी 35 वर्ष असणे आवश्यक.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • उमेदवाराकडे जड व हलके वाहन चालवण्याचा वाहन परवाना असणे आवश्यक आहे.
 • पिंपरी चिंचवड परिसरातून 15 ते 20 किलो मीटर अंतरावर स्थायिक असणे आवश्यक आहे तसेच जवळची व दुरची दृष्टी योग्य असावी.
 • इच्छु उमेदवारांनी क्षत्रिय कार्यालय पुणे येथे दिनांक 01 सप्टेंबर 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत खालील आवश्यक त्या कागदपत्रांसह भेटावे.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment