Police Bharti 2023 : महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस आयुक्त नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, ठाणे ,नाशिक शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर शहर यामधील पोलीस घटक कार्यालयाच्या स्थापनेवरील पदांसाठी सुधारित आकृतीबंधास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.
या आकृतीबंधानुसार नवीन 54638 पदांचा समावेश असणार आहे त्यातील 54057 पदे शासनाकडून भरले जाणार असून उर्वरित सर्व पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत, या पदभरती मध्ये पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलिस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, राखीव पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक या पदांचा समावेश असणार आहे.
रिक्त जागांचा तपशील,पगार व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तर बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये कार्यालयीन शिपाई, सफाई कामगार, शिंपी, मुख्य आचारी, सहाय्यक आचारी, भोजनालय सेवक अशा पदाचा समावेश असणार आहे, या पदांसाठी शहरानुसार सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये दिलेली असून त्या शासन निर्णयांमध्ये रिक्त जागांच्या तपशीला सह सदर पदांसाठी किती वेतन दिले जाणार आहे याची माहिती सुद्धा दिलेली आहे.
संवर्गानुसार विविध पदांसाठी रिक्त जागा शासन निर्णयामध्ये उपलब्ध असून सविस्तर माहितीसाठी तुम्ही शासन निर्णय डाऊनलोड करू शकता. या सुधारित आकृतीबंधास 18 ऑगस्ट 2023 रोजी शासनाकडून मान्यता दिली असून लवकरच या पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.
रिक्त जागांचा तपशील,पगार व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोलीस दलामधील नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई विरार, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या शहरांमध्ये ही भरती (Police Bharti 2023) होणार आहे. विविध शहरातील सविस्तर पदे पाहिजे असल्यास खाली लिंक वर शासन निर्णय दिलेला आहे तो शासन निर्णय तुम्ही डाऊनलोड करून सविस्तर माहिती घेऊ शकता.
भरतीची जाहिरात किंवा भरती विषयी इतर माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा नियमितपणे व्हाट्सअप ग्रुप वर भरती संदर्भातील अपडेट तुम्हाला मिळत असतात.
Hi , mla online from bharach aahe tr ks bhrach , dacument konte lagtat te please kdva