Property Card Online : जागेच्या कागदपत्रामध्ये आपल्याला सातबारा, गाव नमुना आठ, फेरफार हे कागदपत्र तोंड पाठ आहेत आणि माहिती सुद्धा आहेत व कशा पद्धतीने काढायचे हे सुद्धा माहित असेल. याच्या मधलच एक कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड ज्याला मालमत्ता पत्रक म्हटलं जातं.
हे मालमत्ता पत्रक सुद्धा तेवढेच महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे तुमच्या जमिनीच्या संदर्भातला हे डॉक्युमेंट काढण्यासाठी सुद्धा एकदम साधी प्रोसेस आहे तुम्ही सहजरीत्या हे डॉक्युमेंट काढू शकता. तुमच्या जागेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड तुम्ही वापरू शकता हे प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला ऑनलाईन कशा पद्धतीने काढायच आहे, कसं तुम्हाला मिळू शकते याचीच माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी येथे क्लिक करा
जसं तुम्ही सातबारा, फेरफार, गाव नमुना आठ या गोष्टी संबंधित संकेतस्थळावर जाऊन काढतात त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मिळत, खाली तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी ची लिंक दिलेली आहे, महाभूमीने नवीन संकेतस्थळ चालू केले असून नवीन संकेतस्थळा मार्फत तुम्ही आता सगळे कागदपत्र काढू शकणार आहात.
महाभूमीचे जुने संकेत स्थळे तर काही दिवसांमध्ये बदलले जाऊ शकते त्यामुळे त्यांनी नवीन संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सातबारा उतारा, 8अ उतारा, फेरफार ची प्रत, फेरफारची स्थिती, अभिलेख पडताळणी,नकाशा मोजणी पाहणे एवढे सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत.
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी येथे क्लिक करा
त्याच्यासोबतच मालमत्ता पत्रक सुद्धा काढू शकणार आहेत या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सेवा या रकान्यामध्ये मालमत्ता पत्रक उतारा डाऊनलोड हे पर्याय दिसेल (Property Card Online Pune) त्या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला मालमत्ता पत्रक डाऊनलोड करण्यासाठी मुलभूत माहिती विचारली जाते. यामध्ये ULPIN आहे का असं विचारलं जातं.
असेल तर तुम्हाला √ या बटनाला क्लिक करायचा आहे नसेल तर त्याला टिक करायचं नाही, तुम्हाला त्यानंतर तुमचा विभाग, तुमचा जिल्हा, तालुका, गाव, भूमापन क्रमांक निवडायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आ,हे त्यानंतर मिळकत पत्रिका तुम्हाला तिथे दिसेल ती मिळकत पत्रिका तुम्ही पाहायची आहे त्यानंतर ठरवून दिलेली रक्कम तुम्हाला तिथे भरायचे आहे आणि ते मालमत्तापत्रक डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
मालमत्ता पत्रक डाऊनलोड करण्यासाठी एकदम साधी प्रोसेस आहे त्यामुळे सहजरीत्या तुम्ही मालमत्ता पत्रक डाऊनलोड करू शकता, कुठेही बाहेर जाऊन जास्त पैसे मोजण्याची गरज तुम्हाला इथे पडणार नाही.