PM Ujjwala yojana registration : 01 मे 2016 रोजी उत्तर प्रदेश मधील लाँच केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना आज संपूर्ण भारतभर राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येत असते. जवळपास 50 टक्क्याहून अधिक उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन भारतात देण्यात आले.
संपूर्ण भारतात 8 करोडहून अधिक एलपीजी कनेक्शन अंतर्गत देण्यात आलेले आहेत या योजनेचा पहिला टप्पा 01 एप्रिल 2021 रोजी संपला या योजनेत 99.8% एलपीजी कनेक्शन वितरित करण्यात आले. आता उज्वला 2.0 ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत 1.6 करोड महिलांसाठी एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहेत या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सोपी पद्धत आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
पीएम उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला जर अर्ज करायचा करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही महिला असायला पाहिजे आणि तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे या अगोदर गॅसचा कनेक्शन नसाव आणि तुम्ही अनुसूचित जाती/जमाती किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा इतर मागासवर्गीय योजना अंतर्गत असणारे उमेदवार असावेत.
यासाठी तुम्हाला केवायसी चे कागदपत्र लागतील आधार कार्ड, आयडेंटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला लागेल, रेशन कार्ड जर असेल तर रेशन कार्ड तुम्हाला द्यायला लागेल, यासोबतच महिला उमेदवाराच्या कुटुंबाचे आधार कार्ड सुद्धा द्यावे लागेल, बँक अकाउंट चा नंबर आणि IFSC असलेले बँकेचे पासबुक किंवा चेक बुक तुम्हाला द्यावे लागेल आणि आवश्यकता असल्यास इतर कागदपत्रे तुम्हाला जमा करायला लागतील.
पीएम उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला वाटते त्या गॅसचे कनेक्शन तुम्ही या (PM Ujjwala yojana registration) योजने अंतर्गत घेऊ शकता, एवढे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असल्यानंतर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता त्या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतील.
तुम्हाला कोणत कनेक्शन घ्यायचं एचपी, भारत कि ईण्डेन गॅस त्याच्या लिंक वर क्लिक करायचं आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी वेबसाईटकडे नेल्या जाईल आणि त्या पोर्टल वर अर्ज भरून तुम्ही तुमचं एलपीजी गॅस कनेक्शन घेऊ शकणार आहात.